भुसावळात कर्मयोगिनी’तून उमटला अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा ; प्रतिष्ठा महिला मंडळाचा स्तुत्य व उपक्रम;भुसावळच्या प्रतिष्ठा महिला मंडळाचा उपक्रम; स्थानिक नाट्यकलावंतांचे सादरीकरण ;

दिनाचे औचित्य साधून सादर केलेल्या “कर्मयोगिनी” या भव्य नाटिकेतून अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा उसा रसिकांच्या मनावर उमटला. स्टार लॉनवर झालेल्या या नाटिकेत सुमारे ७० स्थानिक स्त्री पुरुष कलावंत सहभागी झाले होते.
यावेळी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, महामंडलेश्वर जनार्दन महाराज, विभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे, डॉ.
संगीता विद्याणी, इनरव्हिल क्लबच्या रश्मी शर्मा आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांच्या संकल्पनेतून या नाटिकेचे सादरीकरण करण्यात आले. यात प्रत्यक्ष घोड्यांचाही वापर करण्यात आला. संगीत प्रकाश
स्क्रीनचा वापर करून होळकरांच्या काळातील वातावरण निर्मिती उत्तम करण्यात आली होती. वेशभूषा व रंगभूषा हुबेहूब करताना पात्र निवड समर्पक असल्याने नाटिका रंगतदार ठरली. सुरुवातीला वरणगाव शहरातील मुलींनी मर्दानी शिवकालीन खेळांचे सादरीकरण केले. यावेळी ‘इनरव्हीलच्या खजिनदारपदी भारतातील पहिली महिला होण्याचा मान मिळविणाऱ्या भुसावळच्या रश्मी शर्मा व पिंपळगाव येथील बचत गटाच्या महिलांसाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या तसेच दालमिलचा व्यवसाय करणाच्या सीआरपी बडगुजर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

कर्मयोगिनी नाटिकेतील सहभागी कलावंतांसोबत वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे व महामंडलेश्वर जनार्दन महाराज.स्थानिक नाट्यकलावंतांचे सादरीकरण च
या नाटिकेत सोए, डॉक्टर, गृहिणी, व्यावसायिक
तरुण आदींनी खुबीने आपापली भूमिका वठवली. अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म, राज्याभिषेक, मृत्यूपर्यंतचे सर्व संजीव प्रसंग कलावंतांनी साकारत भूमिकेत जीव ओतला. सागर पचेरवाल, अजय पाटील यांच्या कोरिओग्राफीने नाटक अधिकच बहारदार झाले. त्यात
पायल पवार , प्रचिती जोशी, रजनी सावकारे, अमित जोशी यांनी अहिल्यादेवींची भूमिका वठवली. मल्हारराव होळकर (अहिल्यादेवींचे सासरे) यांची भूमिका डॉ. मकरंद चांदवडकर तर खंडेराव होळकर (अहिल्यादेवींचे पती) यांची भूमिका सीए विशाल शाह यांनी वठवली. पुजाऱ्याची भूमिका अमीत भग यांनी साकारली.
दरम्यान, भुसावळसारख्या छोट्याशा शहरात टॅलेंटची कमी नाही. येथील कलावाव देण्याची गरज आहे, असे मत वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी व्यक्त केले.

यावेळी डॉ. मकरंद चांदवडकर म्हणाले, अहिल्यादेवीच्या जीवनातील एक प्रभावशाली व्यक्तिमत्व म्हणजे त्यांचे सासरे मल्हारराव होळकर. असे उत्तुंग व्यक्तिमत्व स्टेजवर साकारणे एक आव्हान होते. मात्र दिग्दर्शक सागर व अजय यांचे मार्गदर्शन व सह कलाकारांची साथ यामुळे या भूमिकेला न्याय देता आला याचे समाधान आहे.