दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रात शिवसेनेचे पुन्हा आंदोलन


भुसावळ : गेल्या एक महिन्यापूर्वी शिवसेनेचेच्या उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या भुसावळ तालुका पक्षाच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्त बेरोजगारांच्या हाताला काम मिळण्यासाठी १३ फेब्रुवारीला दीपनगर ६६० औष्णिक विद्युत केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर पाच दिवस बेमुदत आंदोलन छेडण्यात आले होते. मात्र, तरीही दीपनगर प्रशासनाने त्याची दखल न घेतल्याने शिवसेनेच्या माध्यमातून पुन्हा आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे.
या संदर्भात निवेदनात म्हटले आहे की, शिवसेना नेते खा. संजय राऊत, उपनेते संजय सावंत, रावेर लोकसभा संपर्क प्रमुख विजय परब, जिल्हा प्रमुख दीपकसिंग राजपूत, भुसावळ विधानसभा संपर्क प्रमुख संजय गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ तालुका प्रमुख नीलेश महाजन यांच्या उपस्थितीत दीपनगर ६६० औष्णिक विद्युत केंद्राच्या
प्रकल्प ग्रस्त बेरोजगारांना हाताला काम देण्याची मागणी
मुख्य प्रवेशद्वारावर पुन्हा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने प्रकल्पग्रस्त बेरोजगारांना कर्तव्यावर सामावून घेण्यासाठी आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. बेरोजगारांना न्याय मिळणार नाही, तोवर हे आंदोलन सुरूच राहिल, असा इशारा ही निवेदनातून देण्यात आला आहे. बहुसंख्येने शिवसेनेचे पदाधिकारी व बेरोजगार प्रकल्पग्रस्त तरुणांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे.