भुसावळ (प्रतिनिधी ) -८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सर्व कर्तृत्ववान व कर्तव्यदक्ष महिलांचा सन्मान केला जातो. समाजात मुलांच्या तुलनेत मुलींचा घटलेला जन्मदर वाढावा आणि बेटी बचाव बेटी पढ़ाओ,, या अनुषगाने स्त्री जन्माचे स्वागत व महिलांचा गौरव व्हावा या हेतूने भुसावळात महिलादिनी 8 मार्च रोजी जन्मलेल्या बालिकांचा सन्मान दरवर्षी करण्यात येतो .

महिलादिनी जन्मलेल्या बालिकांसह त्यांच्या मातापित्यांचा भुसावळ येथील म्युनिसिपल हायस्कूलचे क्रीडाशिक्षक तथा महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष डॉ. प्रदीप साखरे यांच्यातर्फे दरवर्षाप्रमाणे यंदाही सन्मानचिन्ह ,भेटवस्तू शाल खण,नारळा व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
मन तरी भुसावळ शहरात आठ मार्च रोजी रात्री बारा ते रात्री बारापर्यंत जन्मलेल्या बालिका यांच्या कुटुंबीयांनी डॉ. प्रदीप साखरे ( 7 020 35 81 18,) पंकज साखरे (7972460572 ) यांच्याशी संपर्क साधून दि.12 मार्च 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत नांव नोंदणी करावी.असे आवाहन आयोजकांनी केले आले .


