भुसावळ (प्रतिनिधी ) – जागतिक महिला दिनानिमित्त जेसीआय भुसावळ ताप्ती यांच्यातर्फे डॉ. सुवर्णा गाडेकर यांना महिला रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

वैद्यकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल डॉ. सुवर्णा गाडेकर यांना हा पुरस्कार बहाल करण्यात आला आहे. या प्रसंगी अध्यक्षा सुचित्रा अग्रवाल, सचिव निकिता खुशलानी, मोनिका अग्रवाल, जयश्री अग्रवाल, निकिता अग्रवाल, रेखा व्यास, पल्लवी झोपे, रुचीता अग्रवाल, कंचन अग्रवाल, रुपाली पाटणकर, कामना दीक्षित तसेच सक्षम नारी फौंडेशन च्या सुनीता जोशी, शीतल भालेराव, संगीता जगताप यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन व आभार प्रोजेक्ट चेयरमॅन हेमा बेहरा यानी केले महिला रत्न पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल डॉ सुवर्णा गाडेकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून त्यांच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे .


