भुसावळात जय संताजी महिला मंडळाचा स्तुत्य उपक्रम ; मोफत आरोग्य तपासणीचा शेकडो महिलांनी घेतला लाभ ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – 8 मार्च महिला दिनानिमित्त जय संताजी महिला मंडळभुसावळतर्फे मोफत आरोग्य महामेळावा तेली समाज मंगल कार्यालय भुसावळ येथे सकाळी 10 ते 1 वेळेतआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात गोल्डन अवर हॉस्पिटलचे संचालक डॉ शंतनू साहू, गुरुकृपा डेंटल क्लिनिकचे संचालक रूट कॅनाल स्पेशालिस्ट डॉ राकेश गोगिया, यांनी 145 पेशंटची तपासणी केली..या वेळी चौधरी लॅब चे संचालक मनोज चौधरी यांनी Hb,ब्लड ग्रुप, ब्लड शुगर तपासणी मोफत तसेच थायराईड व कोलेस्टेरॉल तपासणी 50% दरात उपलब्ध करून दिली. त्यासोबत BONE MINERAL DENSITY(BMD) तपासणी मोफत उपलब्ध करून देण्यात आली होती. या दोन्ही सुविधांचा लाभ 120 रुग्णांनी घेतला.

कार्यक्रमाला जनसेवा मेडिकल संचालक निखिल पाटील चौधरी यांनी पेशंटना प्रत्येकी 1 महिन्याचे कॅल्शियम गोळ्यांचे मोफत वाटप केले. कार्यक्रमासाठी प्रसन्न टेंट हाऊस चे संचालक संजय चौधरी यांनी टेबल खुर्च्या ची व्यवस्था करून सहकार्य केले तर संचालिका सविता सोनवणे यांनी पाणी आणि थंडपेय उपलब्धतेसाठी सहकार्य केले. गोल्डन अवर हॉस्पिटल तर्फे मोफत ईसीजी ची तपासणी कॅम्प चा ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली होती..या प्रसंगी मंडळाच्या अध्यक्षा सौ कविता चौधरी यांनी महिलांना शुभेछा दिल्या तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ सुरेखा चौधरी यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रसंगी शुभेच्छा देताना कोणत्याही प्रकारची वैद्यकिय मदत उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कायम सहकार्य करू असे डॉ वृषाली चौधरी, डॉ साहू, आणि डॉ गोगिया यांनी महिला दिनानिमित्त महिलांना वचन दिले.कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांना ट्रॉफी आणि शब्दsuman सन्मानाने गौरविण्यात आले. कार्यक्रम पार पाडण्यास प्रोजेक्ट चेअरमन डॉ वृषाली चौधरी, तसेच सदस्य वैशाली चौधरी यांच्यासोबत, कोषाध्यक्ष.भारती चौधरी ,उपाध्यक्ष रेखा धुपे , सहसचिव प्रतिभा चौधरी , सचिव उज्ज्वला बागुल, सदस्या शीतल चौधरी, सुनीता पाटील, पुष्पा चौधरी, ज्योती चौधरी, उज्ज्वला चौधरी, दिपाली चौधरी, गायत्री चौधरी आणि सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले .महिलांनी स्वताच्या आरोग्यसाठी वेळ आणि प्राधान्य दिल्याने पर्यायाने कुटुंबाचे आरोग्य आणि सुख अबाधित राहते असा मोलाचा संदेश या निमित्ताने समाजाला देण्यात आला .