रमजान महिन्यात मुस्लीम भागातील विविध समस्या सोडवाव्या ; मुस्लीम मंचतर्फे मुख्याधिकारी यांना दिले निवेदन ;

भुसावळ (प्रतिनिधी ) -रमजान महिना उपवास सुरू होत असल्याने खडका रोड भागातील विविध समस्यां सोडवून मुस्लिम बांधवांना होणारा त्रास दूर करावा याबाबत मुस्लिम मंचतर्फे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले .

मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यास रविवार पासून प्रारंभ होत आहे या महिन्यात सर्व मुस्लीम बांधवांचे एक महिन्यासाठी उपवास असतात , यानिमित्ताने मा . मुख्याधिकरी यांना मुस्लिम मंचतर्फे मुस्लिम बांधवांनी निवेदनादवारे कळविले की , खडका रोडवरील मुस्लीम भागात अनेक ठिकाणी सार्वजनिक शौचालय, पथदिवे, लाईट पाणी इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागत आहे . परिसरात सर्वत्र अस्वच्छता असल्याने दुर्गधी पसरली आहे . रमजान महिन्याचे पावत्र नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच रजा टॉवर चौक, शालीमार होटेल चौक, अमरदीप टाकीज चोक, खडका चौक, मुस्लीम कब्रस्थान मधील लाईट बंद आहे, बऱ्याच ठिकाणी हायमास्ट लाईट ची सुविधा नसल्यामुळे आणि ते बंद अवस्थेत आहे सुविधांचा अभाव आहे तरी या भागातील परिसरातील मुस्लिम बांधवांना त्वरित सुविधा द्याव्या व होणारा त्रास दुर करावा व आमचे रमजान महिन्याचे पावित्र्य राखावे ही विनंती .तसेच इदगाह मैदानावर पाण्याची आणि स्वच्छतेची सुविधा करावी. आणि इदच्या दिवशी पाणी सोडण्याची कृपा करावी.अशी मागणी केली आहे याबातचे निवेदन मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांना देण्यात आले आहे .प्रत उपविभागीय पोलिस अधिकारी भुसावळ यांना देण्यात आली आहे . यावेळी हाजी सलीम पिंजारी अध्यक्ष साबिर मेंबर संस्थापक अध्यक्ष मुस्लिम मंच सिकंदर खान मेंबर जुनैद खान मेंबर बशीर ठेकेदार अकबर गवली आदि उपस्थित होते .