भुसावळ – गुरु चंद्रमणी बुद्ध विहार पंढरीनाथ नगर, जामनेर रोड भुसावळ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवरायांना अभिवादन करण्यात आले.
सुरुवातीला रिता तायडे यांनी दीप प्रज्वलन केले. यावेळी शुभांगी वानखेडे यांनी सुंदर असे शिवाजी महाराजांचे गीत सादर केले. तेजस्विनी केदारे यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण केली. अलका सपकाळे आणि शाल्मली केदारे यांनी शिवाजी महाराजांच्या बालपणाविषयी माहिती सादर केली.
कार्यक्रमाला वर्षा ठाकरे, गंगा साळवे, पोर्णिमा केदारे, कविता रायपुरे, आम्रपाली रायपुरे, तेजस्विनी केदारे, रेखा खेडकर, अमिता सोनवणे ,सीमा मकासरे, शीला गुर चल, निकिता सपकाळे, सोनाली केदारे आणि संपूर्ण सावित्रीच्या लेकी ग्रुप सहभागी होता. सूत्रसंचालन मंदाकिनी केदारे यांनी केले



