गणिताची भीती दूर करण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन गरजेचे डॉ चंद्रमौली जोशी


भुसावळ –
गणित हा विषय अतिशय सोपा असून या विषयांमध्ये शंभर टक्के गुण मिळवता येऊ शकतात फक्त गरज आहे ती समजून घेण्याची व समजण्याची तयारी असली पाहिजे खेळा खेळातून गणित शिकले पाहिजे दैनंदिन व्यवहारांमध्ये गणिताशिवाय कोणतेही संभाषण अथवा व्यवहार पूर्ण होऊ शकत नाही ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात घेतली पाहिजे कळत न कळत गणिताचा वापर आपण दैनंदिन जीवनामध्ये करत असतो तरीदेखील विद्यार्थ्यांमध्ये गणिताची भीती आहे ही भीती दूर करण्यासाठी विमलाई गणित विज्ञानमाला याच्यातून छोटासा प्रयत्नअसल्याचे प्रतिपादन रमण सायन्स अँड टेक्नॉलॉजी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. चंद्रमौली जोशी यांनी केले
डॉक्टर उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल येथे विमलाई गणित विज्ञान व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नॅशनल कौन्सिल ऑफ टीचर्स सायंटिस्ट नॅशनल सेक्रेटरी संदीप पाटील नॅशनल ज्युरी डॉ पी एस कोळी, अविनाश मोरे प्रिन्सिपल अनघा पाटील सुनील वानखेडे उपस्थित होते
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यानंतर जोशी यांनी सूत्राने सोडवण्यात येणारे गणिते वेगवेगळ्या ट्रिक्स वापरून अवघ्या काही मिनिटांमध्ये अचूकपणे सोडवता येत असल्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना करून दाखवले तसेच विद्यार्थ्यांनी देखील याचा अनुभव घेऊन ही उदाहरणे या ठिकाणी सोडवली तसेच गणित हा विषय अतिशय सोपा असून त्याविषयी पालकांनी व विद्यार्थ्यांनी मनात भीती भरून घेतली आहे यामुळे हा विषय अधिकच कठीण होतो कोणत्याही विषयांमध्ये गणिताशिवाय पूर्ण होऊ शकत नाही यामुळे गणिताची भीती बाळगू नका गणितावर प्रेम करा असा सल्ला त्यांनी दिला
संदीप पाटील यांनी विद्यार्थ्यांमध्ये गणित व विज्ञान विषयाची भीती दूर करण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून काम केले जाते 26 जानेवारीला पहिले व्याख्यान त्रिमूर्ती पब्लिक स्कूल नेवासा येथे तर दुसरे व्याख्यान संगमनेर येथील भाऊसाहेब विद्यालयात घेण्यात आले असल्याचे सांगितले
प्रिन्सिपल अनघा पाटील यांनी पुस्तकातील ज्ञानासोबतच स्पर्धा परीक्षेला सामोरे जाण्यासाठी विविध ट्रिक्स चा वापर केला पाहिजे यासाठी त्याचा सराव करून समजून घेतले पाहिजे असा सल्ला दिला
विज्ञानाचे किल्ले प्रात्यक्षिक
विज्ञानाच्या प्रात्यक्षिकात विद्यार्थ्यांनी रॉकेट, मंगलयान , चंद्रयान, डोळ्याची रचना, पानाची रचना, गणितातील विविध सूत्रे, मुळाची रचना, जुन्या काळातील घड्याळ, तसेच गणितातील चौकोन, त्रिकोण, पंचकोन, आयत, याचे प्रात्यक्षिक करत त्यातून थ्रीडी शेप तयार केले