भुसावळात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान ; एसटी महामंडळ व नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम


भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ एसटी आगार व बस स्थानक परिसरात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम राबविण्यात आली .
भुसावळ नगरपरिषदेचे ब्रँड अँबेसिडर नाना पाटील सर यांच्या विशेष सहकार्याने एसटी महामंडळ भुसावळ व भुसावळ नगरपरिषद भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता मोहिमेला सुरुवात भुसावळ एस टी आगारात भुसावळ नगर परिषदेचे ब्रँड अँबेसेडर नाना पाटील सर यांच्या हस्ते स्वच्छता मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले . यावेळी त्यांनी स्वच्छता मोहीम राबवण्याची आवश्यकता येऊ नये यासाठी सर्वांनी अस्वच्छता करू नये वेळीच जर सर्वांनी स्वच्छतेचे पालन केले तर स्वच्छता पंधरवडा स्वच्छता अभियान याची गरज भासणार नाही पूर्वी असे कोणतेही अभियान राबविले जात नव्हते स्वच्छता आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग आहे याचं महत्त्व पाहून स्वच्छता सर्वांनी पाळावी असे आवाहन नाना पाटील सर यांनी केले .
भुसावळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी, उपमुख्य अधिकारी, आरोग्य अधिकारी डॉ.वसंत राठोड त्याचबरोबर नगरपालिकेचे ठेकेदार यांचेही वेळोवेळी सहकार्य पर्यावरणासाठी स्वच्छतेसाठी नेहमी सहकार्य मिळत असते . असे ते म्हणाले .
यावेळी एसटी महामंडळाचे आगार व्यवस्थापक राकेश शिवदे यांनीही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने स्वच्छता मोहिमेबद्दल माहिती सांगून भुसावळ नगर परिषदेचे ब्रँड अँबेसिडर नाना पाटील सर यांचे नेहमीच वेगवेगळ्या कार्यासाठी सहकार्य मिळते. त्यांच्या माध्यमातून भुसावळ नगरपरिषद चे मुख्याधिकारी, आरोग्य अधिकारी ठेकेदार यांचे सहकार्य वेळोवेळी मिळत असते.
यावेळी नगरपरिषद चे आरोग्य अधिकारी डॉ वसंत राठोड , ठेकेदार प्रतिनिधी रविंद्र विसपुते, हर्षल परदेशी , बसस्थानक व्यवस्थापक पी बी भोई साहेब , तडवी साहेब, सागर देवकर , जेसीबी चालक प्रवीण भारंबे नगरपातिकेचे सफाई कर्मचारी सह एसटी महामंडळ भुसावळ चे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नगरपरिषदेच्या तर्फे सफाई कामगारांसह जेसीबी ,ट्रॅक्टर. आदींचे सहकार्य मिळाले