भुसावळ – महिला पतंजली योग समिती महाराष्ट्र भुसावळ जिल्हा जळगाव, यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य प्रभारी(योग रत्न पुरस्कार प्राप्त) संजीवनी ताई माने यांच्या अध्यक्षतेखाली योग शिबिर उत्साहात संपन्न झाले यावेळी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बहुसंख्येने महिला पुरुष उपस्थित होते.

सुरुवातीला स्वागताचा कार्यक्रम झाला. त्यानंतर दीप प्रज्वलन करून शिबिराला सुरुवात झाली. संजीवनी ताईंनी महत्वपूर्ण अनमोल असे मार्गदर्शन केले सर्वांना.
योगामध्ये ज्या नवीन आसनांची भर पडली आहे ती करून दाखवली. जिल्हा प्रभारी जयश्रीताई पाटील यांची देखील उपस्थित होती. तसेच राज्य कार्यकारणी सदस्य महानंदाताई पाटील यांचे अनमोल असे सहकार्य लाभले. महानंदाताई व जयश्रीताई दोघांचेही संजीवनी ताईंच्या हस्ते स्वागत सत्कार झाला.
तसेच सर्व योगशिक्षिकांना सुद्धा संजीवनी ताईंच्या हस्ते ट्रॉफी आणि टी-शर्ट देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचा शेवट होम हवन करून संपन्न झाला. सोशल मीडिया प्रसिद्धी प्रमुख मंदाकिनी केदारे यांनी कळविले


