भुसावळ –
भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखे तर्फे संतोषी माता हॉल मध्ये 11 जोडप्यांचा विवाह संपन्न झाला हा 11 वा सामुहिक विवाह सोहळा होता.
नाशिक, बामणोद, न्हावी, डोंगरकठोरा, पाडळसे , रोझोदा, खिरोदा, आमोदा या गावातील मुलामुलींचे वैदिक पध्दतीने विवाह लावण्यात आला.
या वेळी अध्यक्षस्थानी कुटुंबनायक ललितदादा पाटील, उपस्थित होते.
या प्रसंगी समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
भुसावळ शाखा प्रमुख सुहास चौधरी यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
प्रस्ताविक कार्यक्रम चेअरमन आरती चौधरी यांनी केले त्यात त्यांनी भोरगांव लेवा पंचायतच्या उपक्रमांविषयी सविस्तर माहिती दिली व कार्यक्रमाचा उद्देश, समाजातील चुकीच्या खर्चिक पध्दतींना आळा बसावा म्हणून हे उपक्रम राबवत असल्याचे सांगितले. याप्रसंगी मंचावर ललितदादा पाटील, रोहिणीताई खडसे, रजनी सावकारे, कुलसचिव अँड. संजय राणे, माजी आमदार निळकंठ फालक
प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांनी समाजाच्या उपक्रमाचे कौतुक करून जोडप्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी समाजातील काही मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यात राशी पाटील या अपंग मुलीने ग्रॅज्युएशन केल्या बद्दल, तसेच धरती चौधरी हिला विद्यापीठात प्रथम आल्या बद्दल सुवर्णपदक प्राप्त झाल्या बद्दल सत्कार करण्यात आला.
या नंतर जळगाव जिल्हा सहकारी बॅंकेच्या माजी चेअरमन रोहीणी खडसे यांनी आपल्या भाषणातून सांगितले की हल्ली चार चार दिवस लग्नाची पध्दत सुरु झाली आहे, त्यात होणारा अनाठायी खर्च या अशा लग्नामुळे वाचू शकतो. या पुढे समाजात असेच विवाह व्हायला हवे असे सांगून भुसावळ शाखेच्या कामाचे कौतुक केले.
शाखा प्रमुख सुहास चौधरी यांनी कुलसचिव अँड. संजय राणे, यांचा सत्कार केला.
जे. टी. महाजन काँलेज चे चेअरमन शरद महाजन यांचा सत्कार मा. आमदार निळकंठ फालक यांनी तर
यावल तालुक्याच्या खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष नरेन्द्र नारखेडे यांचा सत्कार आर. जी. चौधरीनी केला.
उद्योजिका मंगला पाटीलचा सत्कार रोहीणी खडसे यांनी केला.
या नंतर ह.भ.प. भरत महाराज, यांनी मार्गदर्शन केले व संसारा सुखाचा होण्या साठी सामंजस्याची गरज असते असे सांगितले.
जळगावचे माजी महापौर विष्णू भंगाळेंचे स्वागत हरीश फालक यांनी केले.
जळगाव तालुका आमदार राजू मामा भोळे यांनी उपस्थिती होती त्यांचा सत्कार चेतन पाटील यांनी केले. . तसेच यावल तालुक्याचे धनंजय चौधरी हे देखील उपस्थित होते यांचा सत्कार परीक्षित ब-हाटे यांनी केले. संतोषी माता हॉलचे वासू इंगळे यांचा सत्कार सुहास चौधरी यांनी केला
याप्रसंगी भुसावळ भोरगांवचे संचालक सुभाष भंगाळे, चंद्रकांत चौधरी धीरज पाटील संजय पाटील, अनिल वारके, तसेच जळगावचे अशोक चौधरी, जोस्त्ना ब-हाटे, सुथीर पाटील, तसेच विनीत हंबर्डिकर, अशोक कोळी, प्रभा पाटील, सुनंदा चौधरी,
सुत्रसंचलन कावेरी चौधरी यांनी केले.
आभार प्रदर्शन सुभाष भंगाळे यांनी केले
वधूवरांना गॅस शेगडी सिलेंडर मिक्सर कुकर भांडी देण्यात आले



