भुसावळ – सक्षम नारी फाउंडेशन व एपीएस फिटनेस तर्फे शनिवारी दि. १८ जानेवारी 202५ ला लोणारी हॉल भुसावळ येथे मी सावित्री, मीच जिजाऊ हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांची जयंती केवळ त्यांच्या फोटोला हार न घालता त्यांचे विचार आचरणात आणून साजरी करावी हि या कार्यक्रमाची संकल्पना होती.
त्या निमित्ताने सावित्रीबाई आणि जिजाऊ यांच्या जीवनावर आधारीत वक्तृत्व आणि वेशभुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे रजनीताई सावकारे व परिक्षक म्हणून सक्षम कौन्सिलिंग सेंटर च्या संचालिका आरतीताई चौधरी व नुपूर डान्स अॅकेडमी च्या संचालिका चारू भालेराव मॅडम यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरूवात दिपप्रज्वलनाने व सावित्रीबाई फुले आणि जिजामाता यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून आली.
एपीएस फिटनेस च्या पारूल वर्मा व त्यांच्या टिमने योगावर आधारित नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
वक्तृत्व व वेशभुषा स्पर्धेत स्पर्धकांनी सावित्रीबाई आणि जिजामाता यांच्या जीवनावर भाष्य केले. तसेच सावित्रीबाई व जिजामाताची वेशभुषा करून त्यांचे विचार मांडले. प्रमुख पाहुणे रजनीताई सावकारे तसेच परीक्षक आरतोताई चौधरी आणि चारू भालेराव मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सर्व स्पर्धकांना सर्टिफिकेट व मेडल देण्यात आले.
प्रथम तीन विजेत्यांना ट्रॉफी देण्यात आली.
विजेते.
वक्तृत्व स्पर्धा – प्रथम. टिना शर्मा
द्वितीय – भावना झा
तृतीय- जास्वंदी भंडारी
वेशभुषा स्पर्धा –
प्रथम. मंजु शर्मा
द्वितीय – टिना शर्मा
तृतीय – सविता घाटे.
विशेष पुरस्कार – सना पठाण
योगिता ठाकूर
सुनिता जोशी व शीतल मोरे यांनी सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांचे आजच्या युगातील परिस्थितीवर भाष्य केले.
यावेळेस प्रश्नमंजुषा व उखाणे स्पर्धा सुद्धा घेण्यात आली. तसेच हळदीकुंकू समारंभ ही साजरा करण्यात आला.
वाण म्हणून पर्यावरणपूरक कागदाने बनवलेला प्लास्टिक विरहीत पेन ज्याच्या मागे बिया आहेत तो देण्यात आला. जेणेकरून पेन संपल्यानंतर तो जमीनीत पुरल्यास त्यातुन झाड येईल.
लकी ड्रॉ चे सुद्धा यावेळेस आयोजन केले. लकी ड्रॉ विजेती – निलांबरी झांबरे
साधारण 150 स्त्रियांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.
आपल्यातील सुप्त गुणांना वाव मिळाल्याने सर्व स्पर्धकांनी आयोजकांचे आभार मानले.
सुत्रसंचालन डॉ सुवर्णा गाडेकर व डॉ. दिप्ती पाटील यांनी केले.
कार्यक्रम यशस्वितेसाठी डॉ सुवर्णा गाडेकर, डॉ दिप्ती पाटील, पारूल वर्मा, संघमित्रा ठाकणे, सुनिता जोशी, शीतल मोरे, शीतल भालेराव, सुनंदा डांगे, डॉ वैशाली रामवंशी, गायत्री विसपुते, संगिता जगताप, माधुरी फालक, वंदना कांबळे, वंदना हंस, पल्लवी अंवाडे, मंजु शर्मा, विजया पाटील यांनी परिश्रम घेतले.
युवराज भाऊ लोणारी यांनी विनामुल्य हॉल उपलब्ध करून सहकार्य केले.




