लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली : जानेवारीचा हप्ता ‘या’ तारखेला खात्यात होणार जमा -मंत्री अदिती तटकरे यांची माहिती : निकषात बसत नसलेल्या महिलांना योजनेतून वगळणार !

मुंबई – महायुती सरकारला सत्तेत आणण्यासाठी अत्यंत महत्वकांक्षी ठरलेली लाडकी बहिण योजना आता अधिकाधिक लोकप्रिय झाली आहे. त्यातच आता लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्यांचा हप्ता खात्यात कधी पडतो ? याची उत्सुकता असताना मंत्री आदिती तटकरे यांनी महत्वाची माहिती देत जानेवारी महिन्याचा हफ्ता 26 जानेवारी रोजी खात्यात जमा होणार असल्याचे सांगत तत्पूर्वीच खात्यांमध्ये पैसे येतील, असाही आशावाद व्यक्त केला आहे.
आदिती तटकरे म्हणाल्या की, 26 जानेवारीच्या आधी जानेवारी महिन्याचा लाभ मिळेल असा प्रयत्न सुरू आहे. 3,690 कोटींचा निधी आम्हाला मिळणार आहे. अर्थसंकल्पाच्यावेळी देखील लाभ कसा मिळेल याची तरतूद आम्ही करणार आहोत.आम्ही फेब्रुवारीचे नियोजन सुद्धा करत आहोत. लाडकी बहीण योजनेचा लाभ आम्ही दोन कोटी 46 लाख महिलांना दिला. काही महिलांबाबत तक्रार होती. ड्युप्लिक्शन झालेल्या केसेस कमी होत्या. त्यामुळे फार काही फरक पडेल असे मला वाटत नाही.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी वय 21 ते 60 वर्षे असावे दरवर्षी शासन 46 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार आहे लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावी विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला पात्र आहेत. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे तसेच 60 वर्षे पेक्षा जास्त वय असेल तर महिला लाभासाठी अपात्र ठरेल.

या शिवाय अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणारे, घरात कोणी प्राप्ती कर भरत असल्यास तसेच कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असल्यास तसेच कुटुंबात पाच एकरापेक्षा जास्त जमीन असल्यास व कुटुंबातील सदस्यांकडे चार चाकी वाहन असल्यास ( ट्रॅक्टर सोडून ) अशा महिला योजनेच्या लाभासाठी अपात्र ठरणार आहेत.