सक्षम नारी फ़ाउंडेशन आणि एपीएस फिटनेसतर्फे आम्ही जिजाऊ सावित्री ” अभिनव उपक्रम ;

भुसावल ,- महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा थोरांचे विचार मनात रुजावे याकरिता प्रत्येक स्त्री मध्ये स्वाभिमानाचे बीज रूजविणाऱ्या राजमाता जिजाऊ आणि स्त्रीशिक्षणाची ताकद मनगटी देणाऱ्या सावित्रीमाई यांची जयंती केवळ त्यांच्या फोटोला हार न घालता त्यांचे विचार जागवून, किंबहुना एक दिवस त्यांच्यासारखे बनून साजरी करण्यासाठी सक्षम नारी फ़ाउंडेशन आणि एपीएस फिटनेस घेवून येत आहे अभिनव कार्यक्रम” आम्ही जिजाऊ सावित्री ”
या कार्यक्रमात पुढील स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
१. वेशभुषा स्पर्धा.
विषयः १. सावित्रीबाई फुले
२. राजमाता जिजाऊ
सावित्रीबाई किंवा राजमाता जिजाऊ च्या जीवनावरील एखाद्या प्रसंगाला साजेशी वेशभुषा.
यात केवळ वेश नाही तर त्यांचे विचारही व्यक्त करायचे आहेत.

  1. वक्तृत्व स्पर्धा
    विषयः १. स्त्रीमुक्तीजनक सावित्रीबाई फुले
    2. कवयित्री सावित्री
    ३. परोपकारी सावित्रीमाई
    ४. राजमाता जिजाऊ
    ५. लढवय्या जिजामाता

हि स्पर्धा, १८ जानेवारी, शनिवारी लोणारी हॉल येथे दुपारी १ वाजता घेण्यात येईल.
प्रत्येक स्पर्धेतून ३ विजेत्यांना पारितोषिक तसेच भाग घेणाऱया प्रत्येक सहभागी स्पर्धकास प्रमाणपत्रे देण्यात येतील.
त्याचबरोबर मकर संक्रात ही साजरी करणार आहोत. लकी ड्रॉ, प्रश्नमंजुषा,उखाणा, खुप मस्ती आणि प्रेरणा देणाऱ्या या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी होऊ.
स्पर्धेसाठी नाव नोंदणी आवश्यक आहे. नाव नोंदणीची अंतिम तारीख : 12 जानेवारी
नोंदणी शुल्क : १०० रुपये फक्त
वयमर्यादा: खुला गट,३० वर्षांवरील महिला
कालमर्यादा – वक्तृत्व स्पर्धा. 5 मिनिटे
वेशभूषा स्पर्धा : १ मिनिट

अंतिम निर्णय परीक्षकांचा राहील. तरी महिलांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आजे5 . नोंदणी साठी संपर्क –
सुनिता जोशी -9673104919
पारूल वर्मा – 9561003162
प्रिती चौधरी-7020404725 .