बियाणी स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोषात.


भुसावळ – भुसावळातील बियाणी स्कूल इंग्रजी व मराठी माध्यम मध्ये दि. ७ रोजी वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय शिक्षण समितीचे अध्यक्ष मनोज बियाणी, चेअरमन कोलते फाउंडेशन अँड असोसिएट निशिकांत कोलते, रजनी सावकारे,राष्ट्रीय शिक्षा समितीच्या सेक्रेटरी डॉ.संगीता बियाणी ,विनोद बियाणी,स्मिता बियाणी,राजेश पारीख,प्रवीण भराडिया,गोपाळ ठाकूर,डी.एम. पाटील, शाळेचे मुख्याध्यापक रुद्रसेन बी गंठिया उपस्थित होते.
कार्यक्रम प्रसंगी बालचमुने बहारदार स्वागत गीत सादर केले. तसेच कलकी अवतार, शिवकन्या,शिवबा आमचा मल्हारी,राजस्थानी पारंपारिक नृत्य,हॉरर यासारखे विविध विषय घेऊन बहारदार नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केले. स्वातंत्र्यवीर सावरकर तसेच लाडकी बहीण योजना यासारख्या नाटिका उत्कृष्टरित्या सादर केल्या.पालकांनी व विद्यार्थ्यांनी भरभरुण प्रतिसाद दिला.रुद्रसेन गंठिया यांनी आभार

मानले.

फोटो कॅप्शन – भुसावळ येथील बियाणी पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसम्मेलनात नृत्य सादर करतांना विद्यार्थी.