सुनंदा औंधकर व परिवाराचे समाजभिमुख कौंतुकास्पद कार्य ;श्रीमती सुशिलाबाई सावकारे यांचे हस्ते लोकार्पण संपन्न ; श्रीराम मंदिरात दिले दोन स्टील बेंच सस्नेह भेट ;


भुसावळ – येथील श्रीराम मंदिरात जेष्ठ नागरिकांना बसण्यासाठी स्टील बेंच (बाक) बसविण्यात आले .या बेंचचे लोकार्पण आज मार्गशिर्ष एकादशी गुरुवार दिनांक २६ डिसेंबर रोजी कापड व वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय भाऊ सावकारे यांच्या मातोश्री श्रीमती सुशीलाबाई सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा तथा नामदार यांच्या सुविद्य पत्नी सौ रजनी संजय सावकारे या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्रीमती सुशीलाबाई सावकारे या होत्या . यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला

येथील समाजसेविका तथा जेष्ठ नागरिक संघ महिला अध्यक्षा श्रीमती सुनंदा मुकुंद औंधकर यांनी मंदिरास देणगी स्वरूपात हे स्टीलचे दोन बेंच देवून समाजाप्रती व जेष्ठ नागरिकांप्रती आदर व जिव्हाळा जोपासला आहे . यावेळी सुनंदा औंधकर यांना त्यांचे कुटुंबीय मुलगी न्या . सोनाली औंधकर , सुपुत्र मिलिंद औंधकर यांचे सहकार्य लाभले . प्रसंगी सौ रजनी सावकारे यांनी आपल्या मनोगतातून जेष्ठ नागरिक हे नेहमी तरुण असतात त्यांच्या मार्गदर्शनााची व विचााराची सर्वाना गरज असते जेष्टांचा व थोरामोठयांचा आशिर्वाद सदैव असला पाहिजे त्यांची काळजी घेणे हे आम्हा सर्वांचे कर्तव्य आहे याकरिता जेष्ठनागरिकांना सर्वोतोपरी सहकार्य करणार अशी ग्वाही दिली . यावेळी जय गणेश जेष्ठ नागरिक संघाचे विसपुते काका , न्या औंधकर यांचेसह यांनी समयोचित मनोगत व्यक्त केले .

समाजसेवा हीच इश्वेर सेवा ,ही खूणगाठ पदराशी बांधून गेल्या कित्येक वर्षात विविध समाजपयोगी कार्य करीत असलेल्या श्रीमती सुनंदा औंधकर यांनी प्रास्ताविकात आपण समाजाचेही देणें लागतो हे लक्षात घेऊन इच्छा शक्ती व जिद्द असली म्हणजे हेतू साध्य होतो , मंदिरात सुद्धा वयोवृद्ध आजारी रुग्ण , दर्शनासाठी येतात तेव्हा त्यांना बसण्यासाठी आधार हवा हे लक्षात आले व आज येथील श्रीराम मंदिरात जेष्ठ नागरिकांसाठी बसायला उपयुक्त असे स्टीलचे दोन बेंच देऊन हा खारीचा वाटा पेलवला यापुढे देखील जेष्ठांसाठी व समाजपयोगी विविधांगी कार्य करून सदैव समाज ऋणात राहणार असल्याचा मानस श्रीमती सुनंदा औंधकर यांनी व्यक्त केला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अलका ढाके , यांनी तर आभार श्रीमती जयश्री ढाके , यांनी मानले . या समाजभिमुख लोकार्पण छोटेखानी मात्र महत्वपूर्ण सोहळ्यास जय गणेश जेष्ठ नागरिक संघ पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते .