पतंगीच्या मांज्यात अडकलेल्या कोकिळपक्षाचे गोसेवकांनी वाचवले प्राण ;

भुसावळ – येथील श्रीराम नगर भागातील एका उंच झाडावर गेल्या दोन दिवसांपासून पंतगीच्या माज्यांत अडकलेल्या कोकिळ पक्षाची गोसेवकांनी धडपड करीत सोडवणूक केली यामुळे मृत्यूशी झुंज देणाऱ्या कोकीळ पक्षास जीवनदान मिळाले मांज्यामुळे जखमी झालेल्या पक्षावर इलाज करताच पक्षाने आभाळ्याच्या दिशेने भरारी घेतली . याप्रकाराने समस्त गोसेवकांनी आनंद व्यक्त केला .

सविस्तर दोन दिवसांपासुन श्रीराम नगर मध्ये एका उंच झाडावर पतंगाच्या मांजा मध्ये एक कोकिळा अडकली होती उंच झाड असल्याने लक्षात येत नव्हते पण बाकिच्या पक्षांच्या घोळका व आवाजाने परिसरातील नागरिकांनी बघीतले असता एक कोकिळा मांज्यात अडकली असल्याचे दिसले झाड उंचावर असल्याने जायचे कसे असा प्रश्न पडला हे दृश्य बघताच गोसेवक संत गजानन ग्रुप सेवा संस्थेचे अध्यक्ष राजेन्द्र पाटील , किरण पाटील अॅम्बुलन्स वाले यांच्या मदतीने त्या अडकलेल्या कोकिळेला झाडावर बांबुच्या मदतीने अलगद काढले व पाणी पाजत मांज्यातुन मुक्त केले जखमेवर हळद लावली बरे वाटल्यावर काही क्षणातच कोकिळेने आभाळाच्या दिशेने भरारी घेतली . यावेळी किरण पाटील राजेंद्र पाटील गोरक्षक रोहित महाले , बल्लु धायडे व समस्त गोभक्त यांचे सहकार्य लाभले .

पतंग उडवताना खबरदारी घ्या , नॉयलॉन मांजाचा वापर करू नका – रोहित महाले

सध्या सुरू असलेल्या पतंग महोत्सवानिमित्त सर्व पतंग प्रेमी नागरिकांनी पतंग उडविण्यासाठी नॉयलॉनचा मांजा वापर करू नका यामुळे मानवासह पशुपक्षी यांना इजा पोहचण्याची शक्यता असते , तरुणाईने खबरदारी व सुरक्षा बाळगून पतंग उडविण्याचा आनंद घ्यावा असे आवाहन गोसेवक रोहित महाले यांनी केले आहे .