भुसावळात रेल्वे ठेकेदाराला 40 लाखात गंडवले:जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल ;

भुसावळ – स्टील अ‍ॅथरटी ऑफ इंडियाचा कर्मचारी असल्याचे भासवून भुसावळातील रेल्वे ठेकेदाराला 40 लाखांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संशयीत श्रीकांत मिश्रा विरोधात जळगाव सायबर पोलिसात गुन्हा करण्यात आला आहे.
श्रीकांत मिश्रा याने स्टील अ‍ॅथरटी ऑफ इंडियाचा कर्मचारी असल्याचे भासवून गौरव अनिल मनवानी (शांती नगर, भुसावळ) यांच्याकडून लोखंडी सळईचा माल पुरवतो म्हणून वेळोवेळी ऑनलाईन एनएफटीद्वारे पैसे घेऊन तब्बल 40 लाख 96 हजार 920 रुपये घेतले. परंतु मनवानी यांना लोखंडी सळईचा माल न देता आणखी पैशांची मागणी केल्यामुळे शेवटी त्यांनी जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक सतीश गोराडे करीत आहेत.