राजगुरुनगर – विवाहितेशी असलेल्या प्रेमसंबंधातून एका हॉटेलच्या वेटरने विवाहितेच्या दोन चिमुकल्या मुलींचा खून केला. खुनानंतर दोघांचे मृतदेह पाण्याच्या बॅरेलमध्ये टाकले. ही धक्कादायक घटना राजगुरुनगर शहरातील वाडा रस्त्यावरील एका मोठ्या वर्दळीच्या वस्तीत गुरुवारी उघडकीस आला.

कार्तिकी सुनील मकवाने (9) व दुर्वा सुनील मकवाने (8) अशी मयत बहिणींची नावे आहे. आरोपी वेटरने खुन का केला ? याचे कारण अस्पष्ट आहे.
परप्रांतीय मजुराच्या दोन मुली बुधवारी दुपारी खेळताना गायब झाल्यानंतर खेड पोलिसात हरवल्याची तक्रार देण्यात आली. तपासादरम्यान काही अंतरावरील एका हॉटेलमधील वेटरवर संशयाची सुई गेल्यानंतर गुडघा भर पाणी असलेल्या एका बॅरलमध्ये दोन्ही मुली मृतावस्थेत आढळल्या.
खेड तालुक्याचे ठिकाण असलेल्या राजगुरुनगर येथील धनराज बार मधील वेटरने हे खून केले असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. जवळपास 50 वर्षांचा आरोपी असून अघोरी कृत्य करणार्या आरोपीला पोलीसांनी पहाटे चारच्या सुमारास पुण्यातील एका लॉज वरून अटक केली आहे. काही तासातच पुणे क्राईम ब्रांच पुणे व खेड पोलिसांकडून गुन्ह्याचा छडा लावण्यात आला. मुलींच्या आईचे व वेटरचे प्रेमसंबंध जुळले होते. त्यातुन वेटर ने हा अघोरी प्रकार केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. मयत मुलीचे वडील राजगुरुनगर लगतच्या सातकरस्थळ ग्रामपंचायतीत सफाई कर्मचारी असुन पत्नी मोलमजुरी करते. दरम्यान, याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने ऑनलाईन दिले आहे.


