भुसावळात महिला क्रिडा मंडळातर्फे ५ जानेवारी रोजी महिलांसाठी बाँक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – महिला क्रिडा मंडळ भुसावळ नेहमी सर्व समाजातील स्त्रियांच्या कलागुणांना वाव मिळावा , मानसिक व शारीरिक आरोग्य चांगले रहावे, महिलांनी सक्षम व कुशल असावे, स्वावलंबी व आत्मनिर्भर व्हावे याकरिता विविध खेळांच्या माध्यमातून त्यांना मदत होईल अशा प्रकारचे कार्यक्रम घेत असते. महिलांनी घराबाहेर पडून खेळातील आनंद घ्यावा या उद्देशाने फक्त महिलांसाठी विविध खेळ, स्पर्धा घेण्यात भुसावळ महिला क्रिडा मंडळ अग्रेसर आहे.
सर्व प्रथम भुसावळमधे महिला क्रिकेट स्पर्धा सुरू करण्याचा मान सुध्दा या महिला क्रिडा मंडळाच आहे.

याच अनुषंगाने यंदाही नविन वर्षारंभाला म्हणजेच 5 जानेवारी २०२५ ला महिलांसाठी बाँक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मॅचेस फालक टर्फ हुडको कॉलनी भुसावळ येथे होणार आहे यासाठी अत्यंत अल्प रजिस्ट्रेशन फी व भरघोस बक्षिसांची मेजवानी सहभागी स्पर्धक व संघा करीता मंडळातर्फे देण्यात येत आहे . तरी लवकरात लवकर महिला क्रिकेट संघाने आपल्या टीमचे रजिस्ट्रेशन करावे व स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महिला क्रिडा मंडळ भुसावळच्या अध्यक्षा आरती चौधरी व सदस्यांनी केले आहे . अधिक माहितीसाठी लता होसकोटे, 9823341457 ,मंगला पाटील 9373919017 , किरण चौधरी 7020914356 भारती चव्हाण 7276979682 , जयश्री ओक 7387306134 , प्रभा पाटील 9923631770 , प्राची राणे 9764759910 यांचेशी संपर्क साधावा .