भाजपा अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ शहर पदाधिकारी यांनी ना. संजय सावकारे यांची भेट घेऊन दिले निवेदन ;

भुसावळ – दादर स्थानकाचे नामांतर भारतरत्न प.पू.डॉ.बाबासाहेब आंबेडकर अथवा चैत्यभूमी करण्यात यावे तसेच भुसावळ शहरातील रेल्वे उत्तर वार्ड अतिक्रमण धारकांना हक्काची जागा व घर देण्यात यावे यासह अन्य मागण्या मार्गी लावण्यासाठी नागपूर येथे महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री संजयभाऊ सावकारे यांची भाजपा अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ शहर पदाधिकारी व सदस्यांनी भेट घेतली . याबाबत ना. सावकारे यांना यासंदर्भातील निवेदन देण्यात आले

यावेळी शहराध्यक्ष राहुल वसंत तायडे, सरचिटणीस गणेश भिवसन जाधव,उपाध्यक्ष प्रेमचंद तायडे गौरव वाघ,दिपक गायकवाड यांचेसह सदस्य उपस्थित होते .

दादर स्थानकाचे नामांतर भारतरत्न प.पू.डॉ.बाबासाहेब आंबेडकर अथवा चैत्यभूमी करण्यात यावे तसेच भुसावळ शहरातील रेल्वे उत्तर १वार्ड अतिक्रमण धारकांना हक्काची जागा व घर देण्यात यावे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून हे कार्य लवकरात लवकर मार्गी लावावे असे निवेदनात म्हटले आहे . शहराध्यक्ष राहुल वसंत तायडे, सरचिटणीस गणेश भिवसन जाधव,उपाध्यक्ष प्रेमचंद तायडे गौरव वाघ,दिपक गायकवाड यांनी निवेदन दिले.