नाहाटा महाविद्यालयाचे विशेष हिवाळी शिबिराचे उद्घाटन संपन्न ;


भुसावळ – येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष हिवाळी शिबीर दत्तक गाव किन्ही येथे दि. २४ ते ३० डिसेंबर २०२४ या कालावधीत युथ फॉर माय भारत व युथ फॉर डिजिटल लिटरसी या संकल्पनेवर आयोजित करण्यात आले .
विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील उपस्थित होते. शिबिराचे उद्घाटन श जितेंद्र सपकाळे (भारतीय सैन्यदल) यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच उपप्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे, सर्वोदय हायस्कूलचे सचिव श्री. संजय चौधरी आणि मुख्याध्यापक श्री. एम. एम. चौधरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. विलास महिरे यांनी सादर केले. विद्येची देवता सरस्वती माता व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला वंदन आणि दीपप्रज्वलन करून शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. शिबीराचे उद्घाटक श्री. जितेंद्र सपकाळे यांनी शिबिराचे उद्घाटन झाले असे जाहीर केले आणि शिबिरास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील यांनी शिबीराला शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित मान्यवरांनी देखील शिबीराला शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. संगीता भिरूड यांनी केले तर आभार प्रदर्शन सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. एस. के. राठोड यांनी केले. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी प्रा. एकता बजाज, रासेयो सल्लागार समिती सदस्य उमेश पाटील आणि राजेश सुरवाडे उपस्थित होते. कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी स्वयंसेवक पवन आगळे, चेतन चौधरी, राखी सुरळकर आणि पायल बारी आणि रासेयो स्वयंसेवक उपस्थित होते.