जळगाव : परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ शहरातील विविध संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. तर राष्ट्रवादीच्या वतीने निषेध करीत बीडच्या घटनेतील मुख्य सूत्रधारांना अटक करण्याची मागणी करण्यात आली.
परभणी येथील घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी शहरातील विविध संघटना व समाज बांधवांच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
धरणे आंदोलनात सतीश गायकवाड, विजय सुरवाडे, गणेश पगारे, अजय गरुड, नितीन अहिरे, दिलीप अहिरे, अजय गरुड, डिगंबर सुरवाडे, मुकुंद सपकाळे, अनिल अडकमोल, भारत ससाणे, मिलिंद -सोनवणे, आशिष सपकाळे, अॅड. अभिजीत रंधे, हरिश्चंद्र सोनवणे, शांताराम अहिरे, सुरेश सोनवणे, मनोज अडकमोल, भारती रंधे, क्रांती पवार, संजना मोरे, भाग्यश्री सुरवाडे, छाया सोनवणे, राहुल सावळे, अक्षय मेघे, तुषार तायडे, देवानंद निकम, राहुल सोनवणे, सुनील देवरे, सुनील सोनवणे यांनी सहभाग घेतला.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील व अॅड. रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मंगला पाटील, उमेश पाटील, संगीता भामरे, सचिन पाटील, प्रतिभा शिरसाठ, शशिकांत पाटील, नि इब्राहिम तडवी, रहिम तडवी, दीपक मराठे, राजू मोरे, डॉ. रिझवान खाटीक, डॉ. भरत धनगर, आजाद पटेल आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.
परभणी आणि बीडच्या घटनेतील प्रमुख दोषींवर कठोर कारवाई करावी आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून राज्य सरकारने दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली .



