जळगाव – .२४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन असल्याच्या निमित्ताने ग्राहक पंचायत महाराष्ट्र, जळगाव शाखा, यांच्यातर्फे दुपारी चार ते सात वाजेपर्यंत सिंधी कॉलनी ९९, कवर नगर, येथे रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .

या शिबिरात नाममात्र शुल्क दहा रुपये आकारण्यात आले आहे शिबिराचे उद्घाटन सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी, रुपेश बीजेवार, यांच्या हस्ते होणार आहे. तरी कृपया याचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन ग्राहक पंचायत जळगाव शाखेतर्फे करण्यात आले आहे.


