भुसावळ – परभणी येथील संविधान शिल्पकृती विटंबना प्रकरण तसेच पोलीस कस्टडीत आंदोलनकर्ते भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या झाल्याच्या निषेधार्थ येथील मोर्चा सकल बौद्ध समाज, संविधानप्रेमी,आंबेडकरवादी व तमाम भीमसैनिकांच्या (कृती समिती,)भुसावळ. तर्फे आज २३ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून उपविभागीय अधिकारी (प्रांत ) कार्यालयावर मुकमोर्चा काढण्यात आला . यावेळी भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशीयांच्या मारेकऱ्यास त्वरित अटक करावी या प्रमुख मागणीसह मागण्या करण्यात आल्या यावेळी समाजसेविका निरंजना तायडे , राजश्री सोनवणे , वंदना सोनवणे , यांच्यासह महिलांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार निता लबडे यांना निवेदन सादर केले .


. या निषेध मोर्चात सहभागी सकल बौद्ध समाज, संविधानप्रेमी,आंबेडकरवादी , भीमसैनिक व महिला यांनी हातात निषेध फलक घेऊन काळ्या फिती लावून निषध केला तसेच अनेकांनी संविधानाच्या प्रती हातात घेतल्या होत्या . कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून समता सैनिक दलाने विशेष काळजी घेतली होती . मूक निषेध मोर्चात तमाम संविधानप्रेमी आंबेडकरवादी,भीमसैनिक व महिला युवतींची विशेष उपस्थिती होती मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते .




