भुसावळ | – श्री गजानन महाराज सेवा ग्रुप संचलीत गजानन ग्रुपतर्फे १ जानेवारी २०२५ रोजी भुसावळ ते शेगाव पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. १ जानेवारीला सकाळी ७ वाजता जामनेरोडवरील अष्टभुजा देवी मंदिरापासून पदयात्रेला सुरवात होईल.


पदयात्रेत सहभागासाठी ३१ डिसेंबरपर्यंत निशुल्क नावनोंदणी करता येणार आहे. अधिक माहितीसाठी राजेंद्र पाटील, कौस्तूभ देवधर, रविंद्र देवकर, शरद देवरे, पद्माकर जैन, संतोष शेलोडे, अमित अग्रवाल, दुर्गा महाराज, विवेक चिरमाडे आदींशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


