चांदसर येथे महसूल कर्मचाऱ्यांवर वाळू माफिया यांच्या हल्ल्याचा केला निषेध

भुसावळ – धरणगाव येथील ग्राम महसूल अधिकारी दत्तात्रय पाटील यांच्यावर वाळू माफी यांनी केलेल्या जीव घेण्या हल्ल्याचा निषेध करत उसाळ येथील 30 तलाठी व चार मंडळाधिकाऱ्यांची गुरुवारी काम बंद आंदोलन केले तहसीलदारांना निषेध असे निवेदन देत हल्लेखोरांच्या हटकेचे मागणी केली दत्तात्रय पाटील हे गुरुवारी 19 रोजी पहाटे दोन वाजता चांदसर बुद्रुक येथील गिरणा नदीपात्रात अवैध गौण खनिज वाहतूक प्रतिबंधक पथकासह सेवा बजावत होते वाळू माफी यांनी पाटील यांना फावडे व लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली जिवे मारण्याचा प्रयत्न केला मारहाणीत पाटील यांच्या पायाचे हाड मोडले या घटनेचा महसूल कर्मचाऱ्यांनी निषेध केला तसेच गौण खनिज माफी आणि विरुद्ध कारवाई करताना पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे याबाबत निवेदन दिले आहे

चांदसर येथे महसूल कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यानंतर कर्मचारी आक्रमक झाले यापुढे अवैध गौण खनिज प्रतिबंधक पथकाचे कामकाज कायमस्वरूपी नाकारत असल्याची भूमिका घेतली तसे निवेदन कर्मचाऱ्यांनी तहसीलदारांना दिले वाळू तस्करा वर कारवाई करण्यात गेलेल्या पक्षकावर जिव घेणे हल्ले होत आहेत प्रशासन तर्फे योग्य ते पावले उचलले जात नसल्याने तलाठी दहशत मध्ये आहेत .
जोपर्यंत तलाठी पाटील यांच्यावर हल्ला करणारा गुन्हेगारावर कारवाई होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन भुसावळचे तलाठी संघटना करणार आहे .
निवेदनावर तालुकाध्यक्ष पवन नवगाळे ,मिलिंद तायडे , सुनिता वळवी , साधना खुळे , आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत




