अवैधरित्या गोमांस वाहतूक करणारी कार रंगेहाथ पकडण्यात गोसेवकांना यश ; बजरंग दलाची कामगिरी ;

उल्हासनगर –
बजरंग दलातील गोरक्षकांना नेवाली नाका बदलापुर रोड या ठिकाणी
मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या गोमांस भरुन वाहतुक करणारी सुझुकी रिट्झ कार रंगेहाथ पकडण्यात यश आले यामध्ये गोमाता व बैल यांचे मांस तसेच अवयव आढळुन आले ही गाडी बदलापुर वरुन मुंबईकडे जात होती .

चेतन गोपीनाथ वायले ( वय 20 ) राहणार वसार , पोष्ट मांगरूळ गाव, तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे यांनी फिर्याद दिली की , एक पांढऱ्या रंगाची मारोती सुझुकी रिट्स MH 02 BJ 9574 या कारमधून राज्यात कत्तली बंदी असल्याने गोवंशची अवैध कत्तल करून मांस विक्रीच्या उद्देशाने जात असतांना वासी टोलनाक्यावरून पळून गेले . ही गाडी गेल्या 20 दिवसांपासून कटाई बदलापूर या रस्त्यावर दिसत होती या कारवर लक्ष ठेवून होतो , पोलिसाना माहिती दिली होती त्यावरून गोरक्षक यांनी यामारोती कार पकडली . यावेळी संशयित आरोपी एहसान हसम तुल्ला कुरेशी रा . बी/101 , गॅलेक्सि अपार्टमेंट कुरेशी नगर कुर्ला पूर्व मुंबई यास ताब्यात घेतले . तसेच या कार मध्ये अंदाजे 700 किलो वजनाचे मोठ्या गोवंशाचे मांस व अवयव यासह कार असा एकूण 2लाख 70 हजार रुपयांचा माल ताब्यात घेतला असून याप्रकरणी चेतन वायले यांच्या फिर्यादीवरून प्राणी संरक्षण अधिनियम , पशु संरक्षण अधिनियम १९७६ नुसार व अवैध वाहतुक अशी कारवाई करण्यात येऊन उल्हासनगर हिल्स पोलीस लाईन 5 पो स्टे ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
राज्यात गोमातेला राजमाता म्हणून सन्मान आहे गोहत्याबंदी तरी कसाई कडून गोहत्या सुरुच आहे अवैधरित्या गोमाता व गोमांस वाहतूक करतांना शंका न येण्यासाठी हे कसाई सर्रास पणे कार व रिक्षेचा वापर करीत असतात अश्या कसाई व वाहन चालक तसेच वाहनावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी गोभक्तांनी केली आहे