अल्पसंख्याकांचे हक्क अबाधित असावेत -प्राचार्य डॉ. किशोर कोल्हे.

भालोद – कला व विज्ञान महाविद्यालय भालोद ता.यालव जि.जळगाव या ठिकाणी कला मंडळाच्या वतीने अल्पसंख्यांक समुदायाच्या हक्कांचे रक्षण व्हावे यासाठी अल्पसंख्यांक हक्क दिवस साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम संपन्न झाला.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना प्राचार्य किशोर कोल्हे म्हणाले “महाराष्ट्रातील तसेच भारतातील भाषिक धार्मिक व वांशिक दृष्ट्या अल्पसंख्याक असणारा जो समुदाय आहे. त्यांच्या भाषेचे, संस्कृतीचे, परंपरांचे व मूल्यांचे जतन व संवर्धन करणे भारतीय नागरिक म्हणून आपले सर्वांचे कर्तव्य आहे. अल्पसंख्याक म्हणून कोणत्याही समुदायाची हेटाळणी किंवा मानभंग न करता त्या समुदायाला आत्मसन्मानाने कसे जगता येईल यासाठी आपण सर्वांनी त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करणे गरजेचे आहे”.

यावेळी कार्यक्रमाला कला मंडळाचे सर्व सदस्य, महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कला मंडळ प्रमुख प्रा. डॉ.दिनेश पाटील यांनी केले.