भुसावळातील भिरूड काॅलनीत दत्त जयंती साजरी ;


भुसावळ : येथील जळगांव रोड भिरुड काॅलनी परिसरात दत्तजयंती निमित्त भाविकांनी गुरूचरित्राचे पारायण करीत उत्साहात पालखी काढली. यावेळी भाविकांनी ठिकठिकाणी भव्य रांगोळ्या काढून फुलांचा वर्षाव करून पालखीचे स्वागत केले .

सप्ताहा दरम्यान सुमारे एकविस भक्तांनी गुरुचरित्र पारायणात भाग घेतला.भिरुड काॅलनीतील दत्तमंदिर परिसरात अतिशय भक्तिमय वातावरणात रोज सकाळ -संध्याकाळ आरती ,त्रिपदी,भजने झाली. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी चंदर चव्हाण,नितिन चव्हाण सह भिरुड काॅलनी परिसरातील भाविकांनी परिश्रम घेतले.