जळगाव – कासोदा ता एरंडोल येथिल बांभोरी शिवारातील भागवत त्र्यंबक चौधरी यांच्या बांभोरी येथिल शिवारातील शेतात बिबट्या मृतावस्थेत आढळून आला .
दि.७रोजी सकाळी शेतमालक भागवत त्र्यंबक चौधरी हे नेहमी शेतात गेले . शेती फेरफटका मारत असतांना बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला . या घटनेची चर्चा झाल्यानंतर वन विभाग एरंडोल यांना कळविण्यात आले .
वनविभागाने बिबट्या ताब्यात घेवून शवविच्छेदन साठी एरंडोल येथे पशुवैद्यकिय विभागाच्या ताब्यात दिले आहे .
वनविभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार उपासमारी मुळे बिबट्या मृत झाला असावा असा अंदाज व्यक्त केलाय शवविच्छेदन अहवाला मध्येही उपासमार

अपेक्षित अन्नाचा पाण्याचा अभाव या मुळे मृत्यू झाल्याची माहिती वनविभागाचे बळवंत पाटील उप वनसंरक्षक विजय माळी यांनी दिली .
मृत बिबट्या आढळल्या वरून या परिसरात बिबट्याचा वावर आहे . किंवा भटकंती मुळे मार्ग चुकला असल्यामुळे उपास मार झाली असुशकते ., तरी नागरिकांनी सतर्क रहावे, अन्य बिबटे असण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकरी वर्गात भितीचे वातावरण आहे .
या बिबट्या सोबत आणखी बिबट्या असल्याची चर्चा असून शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे, शेतात जातांना सामूहीक पणे व स्वसंरक्षण साठी आवश्यक साहित्य सोबत आसावे सध्या शेतीच्या हंगाम सुरू आहे . त्यामुळे शेतकरी वर्गाने काळजी घ्यावी असे आवाहन वनविभागाकडून करण्यात येत आहे.


