भुसावळात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन ;

भुसावळ- भारतरत्न डॉ.बाबासाहेबर आंबेडकर यांच्या ६८व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भुसावळ शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला हजारो समाज बांधवांसह शासकीय अधिकारी यांनी पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले .

अभिवादन करण्यासाठी आंबेडकर अनुयायींसह उपासक उपासिका यांनी सकाळपासून रांगा लावल्या होत्या. यावेळी समता सैनिक दलाच्या वतीने डॉ.बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर विविध घोषणा देण्यात आल्या.

राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केले अभिवादन
भुसावळ – भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहा डिसेंबर रोजी ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भुसावळ शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्या जवळ सकाळी बुद्ध वंदना, श्रीशरण पंचशील, भीम स्तुती, शरणेत्तय घेऊन हजारो आंबेडकर अनुयायांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. त्यानंतर प्राताधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार निता लबडे, नगरपालिका उप मुख्याधिकारी परवेझ शेख, नगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. कीती फलटणकर डॉ. संदीप जैन यांच्यासह नर्सिंग स्टॉप नगरपालिका कर्मचारी शहरातील हृदय रोग तज्ञ डॉ. राजेश मानवतकर, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रविंद्र निकम, संतोष साळवे, हमीद शेख, संदाशिव आनंद चौथमोल, कलीम बेग अँड. प्रविण सुरवाडे, राम अवतार, नरेंद्र म्हस्के, सुजाता सपकाळे, वंदना चव्हाण, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मो. मुन्नवर खान, विलास खरात पॅंथरचे प्रदेशाध्यक्ष सिध्दार्थ सोनवणे, उबाठाचे शहर संघटक योगेश बागुल, शिव भोजन केंद्रांचे संचालक उमाकांत उर्फ नमा शर्मा, आरपीआयचे जिल्हानेते सुदाम सोनवणे, शहराध्यक्ष सुनील ढीवरे, भाजपाचे नेते प्रमोद सावकारे, शहराध्यक्ष युवराज लोणारी, अनुसूचित जाती मोर्चाचे शहराध्यक्ष राहुल तायडे, समाजिक कार्यकर्ते गणेश जाधव, अलका शेळके यांच्या सह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.