भुसावळ – गुरु चंद्रमणी बुद्ध विहार पंढरीनाथ नगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले .
येथील नाहाटा परिसरातील सर्व उपासक उपासिका यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सकाळी नऊ वाजता गुरुचंद्र मनी बुद्ध विहारात एकत्रित येवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी जी. बी. रायपुरे यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर श्रद्धांजलीपर एक गीत गायले . तसेच तेजस्विनी केदारे हिने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कविता सादर केली. तसेच अनिता तायडे व मनोरमा बोरकर यांनी बाबासाहेबांविषयी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी नाहटा परिसरातील सर्व उपासक उपासिका यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. सूत्रसंचालन प्रिया मेढे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सावित्रीच्या लेकी ग्रुप यांनी परिश्रम घेतले.


