देशभरातील रेल्वे स्थानकावरील भव्य तिरंग्यासमोर रोज राष्ट्रगीत सादर व्हावे -शिशिर जावळे यांच रेल्वे मंत्र्यांना पत्र

भुसावळ
देशाचा गौरव आणि सन्मानाचे प्रतीक म्हणजे राष्ट्रीय ध्वज तिरंगा आणि भारतीय रेल्वे ने भारतातील सर्व प्रमुख रेल्वे स्थानकांवरती शंभर फूट उंचीचा चाळीस फूट लांब आणि तीस फूट रुंद असलेला राष्ट्रध्वज तिरंगा रेल्वेच्या जागेमध्ये फडकवण्याचा निर्देश दिलेले असून भारतातील विविध प्रमुख रेल्वे स्थानकांवरती मोठ्या डौलाने आज तिरंगा फडकताना दिसत आहे .
भारतातील जनतेमध्यें राष्ट्रभावना जागृत करून देशाची राष्ट्रीय अखंडता एकता कायम टिकवण्यासाठी , राष्ट्रध्वजापासून सर्वांना प्रेरणा मिळावी. या देशाच स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या शहिद , हुतात्मे यांच बलिदान चिरकाल स्मरणात राहण्यासाठी त्यापासून प्रोत्साहन घेण्यासाठी हा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतलेला आहे. रेल्वे प्रशासनाने घेतला हा निर्णय नक्कीच कौतुकास्पद आहे आणि अभिमानास्पद आहे यासोबत भारतीय रेल्वेने ज्या ज्या प्रमुख रेल्वे स्थानकांवरती ह्या तिरंग्यांची राष्ट्रध्वजाची उभारणी केलेली आहे. राष्ट्रध्वज केवळ शोभेची वस्तू नसून अशा राष्ट्रध्वजाचा सन्मान व्हावा म्हणून अशा राष्ट्रध्वजासमोर दररोज सकाळी रलेक वेळ रेल्वे प्रशासनाने तेथील स्थानिक नागरिकांना आवाहन करून राष्ट्रगीत सदर करावं अशा मागणी च विनंती पत्र भारतीय जनता पार्टीचे ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव शिशिर जावळे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पाठविले असल्याच त्यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.