पंधरा हजाराची लाच भोवली ; पारोळा येथील दोघा पोलिसांवर लाच लुचपत विभागाची कारवाई ;

पारोळा
पारोळा तालुक्यातील धरणगाव रस्त्यावर झालेल्या अपघात प्रकरणी आरोपी अटक न करण्याच्या कामासाठी तक्रारदाराकडून तीस हजाराची लाज मागितली या प्रकरणी तडजोड अंती आज पंधरा हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहात पकडले या प्रकरणी दोघा पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबत असे की यातील तक्रारदार हे दि. 7.11.2024 रोजी मोटार सायकल ने पारोळा ते धरणगाव रस्त्यावर जात असतांना त्यांच्या मोटारसायकल ची समोरून येणाऱ्या मोटरसायकलशी धडक होऊन त्यामध्ये समोरील मोटोरसायकल वरील इसम मयत झाल्याने तक्रारदार यांचेविरुद्ध पारोळा पो.स्टे. येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्यात तक्रारदार यांना अटक न करणेकरीता येथील आरोपी हिरालाल देविदास पाटील वय- 43 वर्ष पारोळा पो.स्टे.रा प्लॉट. नं.66, हरिओम नगर, गळवाडे रोड, अमळनेर ता.अमळनेर जि.जळगाव, प्रवीण विश्वास पाटील, वय.45 वर्ष, रा. पोलीस लाईन, बसस्थानकाजवळ, पारोळा ता.पारोळा जि.जळगाव यांनी तक्रारदार यांचेकडे 30,000/- रु लाचेची मागणी केल्याची तक्रारदार यांनी तक्रार दिली होती करून तडजोडीअंती 15,000/-रु तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी केली. याबाबत आज धुळे येथील लाचलुचपत विभागाने सापळा रचला असता एकाला फोन करून सांगितले की सदरची रक्कम घेऊन घे व दुसऱ्या आरोपींनी रक्कम स्वीकारली असता त्यास रंगेहाथ पकडण्यात आले यातील एका आरोपीस पकडण्यात आले असून दुसरा फरार आहे याबाबत त्यांच्या विरुद्ध पारोळा पो.स्टे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
धुळे येथील लाच लुचपत विभागातील पंकज शिंदे ,पोलीस निरीक्षक, पो.हवा. राजन कदम, मुकेश अहिरे, सुधीर मोरे ,जगदीश बडगुजर पो.शि.रामदास बारेला, प्रवीण पाटील यांनी ही कारवाई केली