भुसावळ न्यायालयात विधी सेवा समितीतर्फे संविधान दिन साजरा ;


भुसावळ – संविधान दिनानिमित्त भुसावळ येथील जिल्हा व सत्र न्यायालयात तालुका विधी सेवा समितीच्या वतीने संविधान दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले संविधानाचे पितामह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधानाचे पूजन करून अभिवादन जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.एस्.टी. सुर व उपस्थित सर्व न्यायाधीशांच्या आणि वकीलांच्या हस्ते करण्यात आले
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान जिल्हाव सत्र न्यायाधीश तसेच अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती श्री‌.एस टी सुर यांनी भूषविले कार्यक्रमाच्या सुरुवातीला ॲड जास्वंदी भंडारी यांनी संविधानातील उद्देशिकेचे वाचन केले अध्यक्ष मनोगतात न्यायाधीश श्री एस.टी. सूर यांनी संविधानामुळे आपण कायद्याची व्यवस्थितरित्या अंमलबजावणी करत आहोत आणि संविधानामुळेच राष्ट्र बळकट असल्याचे ते म्हणाले. यावेळी वक्त्यांनी मनोगतातून संविधाना प्रति आपल्या भावना व्यक्त केल्या ॲड‌. आय.आय. खान यांनी संविधानामुळेच आपल्याला मौलिक अधिकार मिळाले .वर्ण,जाती, भेदभाव विसरून सर्व राष्ट्र एक संघ राहिल्याचे यावेळी ते म्हणाले तसेच त्यांनी विधी सेवा समितीच्या कार्याची माहिती करून दिली ॲड. सुनील पगारे यांनी संविधाना मुळेच समता समाजात दिसत असल्याचे स्पष्ट केले सर्व जाती-धर्माच्या नागरिकांना देशात समान अधिकार मिळाले मुख्य म्हणजे महिलांना शिक्षणाचा अधिकार स्वातंत्र्याचा, अभिव्यक्तीचा अधिकार मिळाल्यामुळेच आज महिला सर्व क्षेत्रात प्रगती करत असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले .

संविधानाचे खरे शिल्पकार हे बाबासाहेब आंबेडकरच आहेत आणि त्यांनी केलेला त्याग, बाबासाहेबांची राष्ट्रपतीची निष्ठा त्यांनी रचलेला लोकशाहीचा पाया कदापी विसरता कामा नये असे ॲड.मधुकर सपकाळे आपल्या मनोगतात म्हटले

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ॲड .जास्वंदी भंडारी यांनी केले प्रास्ताविकात त्यांनी संविधान आहे तर राष्ट्र आहे राष्ट्राचा गाभाच संविधान आहे असे सांगत देशात पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या विमर्श्यापासूनच सर्वांनी जागृत राहावे आपल्या देशाचे संविधान कोणी बदलू शकत नाही तशी त्यात तरतूद आहे हे ही त्यांनी आवर्जून सांगितले सर्वांचे ऋणनिर्देश ॲड प्रफुल्ल पाटील यांनी मानले

कार्यक्रमासाठी जिल्हा न्यायाधीश श्री एस. बी. हेडाऊ, अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश श्री एल‌ डी. गायकवाड, दिवाणी न्यायाधीश व.स्तर श्री.एस व्ही .मोरे ,दिवाणी व फौजदारी न्यायाधीश क. स्तर श्रीमती के. एम .पत्रे, दिवाणी व फौजदारी न्यायाधीश क. स्तर श्री. एम. आर. बागडे दिवाणी व फौजदारी न्यायाधीश क. स्तर श्रीमती एस. व्हि. न्यायाधीश ॲड .सुशील बर्गे यांच्यासह सर्व पदाधिकारी, वकील , न्यायालयाचे सर्व कर्मचारी वृंद कार्यक्रमास उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विधी सेवा समितीचे लिपिक श्री पारध्ये श्री तुषार वानखेडे श्री कमलाकर जावळे रिटेनर लॉयर ॲड जास्वंदी भंडारी ॲड दिनेश चव्हाण ॲड प्रीतम मेढे सर्व शिपाई वृंद यांनी सहकार्य केले