भुसावळ राज्य उत्पादन शुल्क विभागातील उपनिरीक्षक व पंटर अँटीकरप्शनच्या जाळ्यात; 30हजाराची लाच भोवली ;

भुसावळ – भुसावळ शहरातून मोठी खळबळजनक बातमी समोर आलेली असून, येथील राज्य उत्पादन शुल्क विभागातील उपनिरीक्षक किरण सोनवणे (वय 39) यांनी दि.19/11/2024 रोजी त्यांचेसोबत असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथकाने तक्रारदार यांचे घरी जाऊन अवैध दारू विक्री बाबत छापा टाकला होता. सदरचा छापा मध्ये तक्रारदार यांचेकडेस असलेला 30 ते 35 हजार रुपये किंमतीच्या दारुच्या बाटल्या जप्त केल्या होत्या व दारूची केस न करण्यासाठी 10 हजार रुपये घेतले होते. दारूची केस न करण्यासाठी तक्रारदार यांच्या कडून 50 हजार रुपयांची मागणी केली होती.

त्याबाबत आज दिनांक 22/11/2024 रोजी तक्रारदार यांनी समक्ष लाप्रवि जळगांव यांना तक्रार दिली होती. सदर तक्रारीची पंचा समक्ष लाच मागणी पडताळणी केली असता पडताळणी कारवाई दरम्यान दोन्ही आरोपीनी दारू विक्री करण्यासाठी व तक्रारदार यांना त्रास न देण्यासाठी प्रथम 50हजार रुपयांची केली मात्र तडजोड अंती ३०हजार रुपयाची मागणी करून लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली.

आज दि.22/11/2024 रोजी यातील आरोपी क्रमांक 2 किरण माधव सुर्यवंशी, वय 37, रा. हुडको कॉलनी भुसावळ ( खाजगी इसम) यास 30हजार रुपये लाचेची रक्कम स्विकारताना रगेहाथ पकडण्यात आले असून त्यांचेवर फैजपूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
सदरील कार्यवाही ही श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर , पोलीस अधीक्षक ला..प्र.वि,नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली, योगेश ठाकूर पोलीस उपअधीक्षक लाप्रवि जळगांव यांच्या अचूक नियोजन पाठपुराव्यामुळे सापळा रचून तपास अधिकारी श्रीमती स्मिता नवघरे, पोलीस निरीक्षक, लाप्रवि जळगांव, बाळू मराठे,राकेश दुसाने यांच्या पथकाने केली आहे .