रावेर विधानसभेत परिवर्तन निश्चित : प्रहारचे उमेदवार अनिल चौधरी यांचा दृढ विश्वास –


रावेर – रावेर मतदारसंघात जनता घराणेशाहीला कंटाळली असून आपली निवडणूक जनतेने हातात घेतली होती. मतदारसंघात नवीन उद्योग तर आलेच नाही मात्र जे होते ते देखील सत्ता भोगलेल्यांनी बंद पाडले.

रस्ते नाही, रोजगार नाही, उत्तम आरोग्य, शिक्षण व्यवस्था नसल्याने जनता त्रस्त झाली होती. जनतेला परिवर्तन हवे होते. जनता माझ्या पाठीशी असल्याने माझा विजय निश्चित असल्याचे प्रहारचे उमेदवार अनिल छबीलदास चौधरी यांनी सांगितले.