भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी सहपरिवार बजावला हक्क –


भुसावळ – भुसावळ विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार व विद्यमान आमदार संजय सावकारे यांनी आपल्या कुटूंबासह बुधवार, २० रोजी मतदानाचा हक्क बजावला.

आमदार सावकारे यांनी पत्नी रजनी सावकारे, आई सुशीलाबाई सावकारे, मुलगा युगांक सावकारे सह संत गाडगेबाबा शाळेत मतदानाचा हक्क बजावला.

नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मतदान करा – आवाहन
लोकशाही सृदुढ होण्यासाठी मतदारांनी जास्तीत-जास्त संख्येने बाहेर पडून मतदान करावे, असे आवाहन यावेळी आमदार संजय सावकारे यांनी केले.