भुसावळ – येथील मुख्य बाजारपेठ भागात सुरू असलेल्या बांधकामाचे साहित्य अचानक कोसळले यामुळे खाली उभी असलेल्या रिक्षा याखाली दबली गेल्याने रिक्षाचे नुकसान झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान घडलली . सुदैवाने जीवितहानी झाली नाही . मात्र बांधकामाचे परिसरातील सुरक्षेचा मुद्दा समोर आला आहे मुख्य बाजारपेठेतील अर्चना प्रोव्हिजन नजिक सुरू असलेले बांधकाम ठिकाणी एक रिक्षा उभी होती अचानक बांधकाम साहित्य कोसळल्याने रिक्षा दबली गेली यात रिक्षेचा काच व टफ फुटून रिक्षाचे नुकसान झाले तसेच बांधकामाचे साहित्य पडल्यामुळे विजेच्या तारा तुटल्यामुळे खंडित झालेला परिसरातील वीज पुरवठा सुमारे चार तासाने सुरळीत झाला होता .



