भुसावळ विधानसभा मतदारसंघातील Micro Observer यांचे तापी सभागृह येथे प्रशिक्षण ; शासकीय धान्य गोदाम तहसील कार्यालय येथे EVMs सिलिंग सेटिंग .


भुसावळ – आज दि १४/११/२०२४ रोजी General Observer राजेश कुमार सर यांच्या अध्यक्षतेखाली तापी सभागृह, उपविभागीय कार्यालय भुसावळ येथेआयोजित प्रशिक्षण सत्रात भुसावळ विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता नियुक्त Micro Observer यांचे प्रशिक्षण पार पडले. मतदानाच्या दिवशी सकाळी ५.३० वाजता मॉकपोल घेऊन ते मतदान संपेपर्यंत नेमून दिलेले झोन मध्ये प्रत्येक ठिकाणचा संपूर्ण अहवाल RO कडे जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नमुना नं १७-A बद्दल माहिती दिली. त्यावेळी कर्मचाऱ्यांना विचारलेल्या शंकांचे निरसन देखील केले.
तसेच आज तहसील कार्यालय येथे सकाळी ८वाजेपासून २० टेबल वर 19 राऊंड मध्ये 380 EVMs चे सिलिंग सेटिंग चे कामकाज पार पडले
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील , तहसीलदार श्रीमती नीता लबडे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ सचिन पानझाडे तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र फातले व निवडणूक नायब तहसीलदार डॉ.अंगद आसटकर हे उपस्थित होते