ऑक्टोबर महिन्यात भुसावळ विभागाला १२१ कोटी रुपयांचा राजस्व प्राप्त


भुसावळ – भुसावळ विभागाने वित्तीय वर्ष २०२४-२५ मध्ये ऑक्टोबर मध्ये महसुलाचे विविध क्षेत्रात लक्षणीय वाढ साधून असाधारणपणे चांगली कामगिरी केली आहे.
या वित्तीय वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यात:
• यात्री राजस्व: ६३ कोटी रुपये
• अन्य कोचिंग: ०६.५५ कोटी रुपये
• माल परिवहन: ५१.३९ कोटी रुपये
• विविध आय: २.३९ कोटी रुपये

टिकट तपासणीने या यशात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. एकूण ५४,००० प्रकरणांमधून ३ कोटी १६ लाख रुपये राजस्व प्राप्त झाले आहे.
टीम भावना व सहकार्याने रेल्वे राजस्व वाढविण्यासाठी सतत प्रयत्नशील असून आगामी काळात अधिक उत्कृष्ट कामगिरी करण्याचा निर्धार केला आहे. रेल प्रशासन आपल्या आदरणीय रेल्वे प्रवाशांना तक्रार रहित सेवा प्रदान करण्यास वचनबद्ध असून राजस्व वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.
ऑक्टोबर -2024 या महिन्यात ऑटोमोबाईल लोडिंगने 49 रेक्स लोड करण्यात आले ज्यातून 6.20 कोटी रुपयांची मालवाहतूक महसूल प्राप्त करण्यात आला. एकूण 49 रेक्स पैकी नाशिकमधून 25 रेक आणि देवळालीतून 24 रेक लोड करण्यात आले.
ऑक्टोबर महिन्यात प्रवाशांच्या सुविधेसाठी मनमाड स्टेशन्सवर बॅटरी कार सेवा सुरू करण्यात आली आहे. या सुविधांमुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्तीं , महिला आणि आजारी व्यक्तींसाठी खूप मदत होईल.
प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी आणि सन्मानाने प्रवास करण्यासाठी, भुसावळ विभाग प्रवाशांना योग्य आणि वैध रेल्वे तिकीट घेऊनच प्रवास करावा असे आवाहन करीत आहे. तसेच प्रवाशांनी जास्तीत जास्त प्रमाणात यूटीएस ॲप चा वापर करावा.