भुसावळ -भुसावळ येथे ऑल सोल्स डे, हा 2 नोव्हेंबर रोजी साजरा केला गेला, ही एक ख्रिश्चन परंपरा आहे जी शुद्धीकरणात मृत झालेल्या विश्वासूंसाठी प्रार्थना करते. उत्सवांमध्ये स्मशानभूमींना भेट देणे, पूर्वजांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या मृत्यू स्थळी मेणबत्ती लावून प्रार्थना केली जाते. तसेच मेणबत्त्या पेटवणे आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहणे यांचा समावेश होतो.हयात नसलेल्या जवळच्या व्यक्तींना नातेवाईकांना स्मरण करण्याचा दिवस म्हणजे ऑल सोल्स डे कॅथलिक समाजात या दिवसाला विशेष महत्त्व दिले जाते.
यंदा सुद्धा ऑल सॉल्स डे ला भुसावळ येथील कॅथलिक ख्रिश्चन कब्रस्तानात शनिवारी संध्याकाळी ख्रिश्चन बांधवांकडून त्यांच्या नातेवाईकांमध्ये मृत झालेल्या व्यक्तींच्या आत्मास शांती लाभो म्हणून सामूहिक प्रार्थना करण्यात आली.
यावेळी कब्रस्तानात जाऊन ज्यांनी त्यांनी ज्यांच्या त्यांच्या नातेवाईकांच्या कबरची स्वच्छता करून तेथे गुलाबाची फुले , झेंडू ची फुले , बुके फुलहार तसेच कॅण्डल लावून मृतात्मास शांती लाभो म्हणून प्रार्थना केली. त्यानंतर फादर इमिल तिरके व फादर समीर मिंज यांनी शांतीचा संदेश वाचला.यावेळी भुसावळ शहर सह परिसरातील कॅथलिक ख्रिश्चन बांधव परिवारसह उपस्थित होते.

फोटो – भुसावळ येथील ख्रिश्चन कब्रस्तानात ऑल सॉल्स डे निमित्त मृत आत्मास शांती लाभो म्हणून प्रार्थना करताना निना कटलर.


