भुसावळ : भुसावळ शहरातील मातृभूमी चौकात गुरूवारी सकाळी पाडवा पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पहाटे सहा वाजेच्या सुरू झालेल्या कार्यक्रमाने श्रोते मंत्रमुग्ध झाले. ‘ऐरणीच्या देवा तुला’ या गाण्याला प्रेक्षकांची दाद मिळाल्याने हे गीत वन्समोर झाले. दोन तास चाललेल्या कार्यक्रमाने रसिकांना भावगीते, भक्ती गीतांची मेजवानी मिळाली. शहरातील मातृभूमी चौकात जय मातृभूमी मंडळाचे अध्यक्ष किरण कोलते यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
पहाटे सहा वाजता सुरांची सोनसकाळ हा नरक चतुर्दशी अभ्यंगस्नात मुहूर्तावर दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सकाळीच कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. यावेळी दीपावली मनाई सुहानी, वासूदेवावर भक्तीगीत सादर केले. ऐरणीच्या देवा तुला या गाण्याला पे्रक्षकांनी भरभरून दाद मिळाली. यामुळे हे गाणे वन्समोर झाले. अरुण दाते यांच्या या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या गाण्याने प्रचंड टाळ्या मिळविल्यात. कार्यक्रमास महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. राजकीय मंडळीसोबत परिसरातील रहिवाशांनी सुध्दा या पाडवा पहाट कार्यक्रमाचा आनंद घेतला.



