शिक्षित होत असतांना सुरक्षित असणे अत्यंत महत्वाचे – चाइल्ड कौन्सिलर आरती चौधरी : इनरव्हील क्लब ऑफ रेल सिटीतर्फे स्वसुरक्षा कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन ;

भुसावळ – लहान मुलां बरोबर समाजात घडणारे दुदैवी घटना बघता सामाजिक बांधिलकी जपणारा कार्यक्रम इनरव्हील क्लब ऑफ रेल सिटी यांनी लहान मुलांसाठी गुड टच बॅड टच व सेल्फ डिफेन्स ( स्वसुरक्षा) हा कार्यक्रम घेऊन मुला लहान मुलांमध्ये जागरूकता व आत्मविश्वास निर्माण केला.
इनरव्हील क्लब ऑफ रेल सिटीच्या अध्यक्षा सौ मीनाक्षी धांडे व प्रोजेक्ट चेअरमन सौ सुनिता पाचपांडे यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम आयोजित केला.

यामध्ये चाइल्ड कौन्सिलर आरती चौधरी यांनी अत्यंत सोप्या भाषेत व मुलांना समजेल अशा शब्दात मार्गदर्शन केले. व्यासपीठावर प्रो. चेअरमन सुनिता पाचपांडे, अध्यक्षा मीनाक्षी धांडे, वक्त्या आरती चौधरी व प्रिन्सिपल निना कटलर उपस्थित होत्या.
प्रास्ताविक अध्यक्षा मिनाक्षी धांडे यांनी केले व कार्यक्रमाचा उद्देश सांगताना आपल्या देशाच्या भावी पिढीची सुरक्षितता, काळजी घेणे आवश्यक आहे. म्हणून आम्ही हा कार्यक्रम घेत आहोत हे सांगितले.
आरती चौधरी यांनी मुलांना छोट्या गोष्टींमधुन मनोरंजन करत मार्गदर्शन केले. आपली भावी पिढी “शिक्षित होत असताना सुरक्षित” असणे महत्वाचे आहे हे सांगितले.
प्रिन्सिपल नीना कटलर यांनी मुलांना मार्गदर्शन केल्याबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी १०००मुलांना याचा लाभ मिळाला.
या प्रसंगी इनरव्हील क्लब ऑफ रेल सिटीच्या सौ. हेमलता सोनार ,सौ. रेवती मांडे, सौ. योगिता वायकोळे, सौ.अदिती भडंग, हजर होत्या.