गोजोरे ग्रामपंचायत येथे कायदेविषयक शिबिर संपन्न ;

भुसावळ – अखिल भारतीय अधिवक्ता परिषद भुसावळ तथा ग्रामपंचायत गोजोरे यांच्या संयुक्त विद्यमानाने गोजोरे येथे दिनांक 29/09/2024 रोजी कायदेविषयक शिबिर संपन्न झाले . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ग्रामपंचायतच्या सरपंच सौ नंदाताई कोळी यांनी भूषविले

कार्यक्रमास अधिवक्ता परिषदेचे अध्यक्ष राजेश जी शर्मा, अधिवक्ता परिषदेचे महामंत्री सचिन कोष्टी, मुकेश चौधरी सहमंत्री, महेशचंद्र तिवारी उपाध्यक्ष,अधिवक्ता ऍड वैशाली चौधरी , उपाध्यक्ष,ऍड योगेश दलाल तसेच ग्रामपंचायत गोजोरे सरपंच सौ नंदा ताई कोळी, उपसरपंच चंद्रकांत पाटील मा. सैनिक लक्ष्मण सपकाळे तसेच ग्रामपंचायतचे सदस्य तानाजी पाटील भास्कर डोळे , मोहन तळले , आदी पदाधिकारी उपस्थित होत .

आयोजित शिबिरात ऍड महेशचंद्र तिवारी यांनी मोटर वाहन कायदा या विषयावर, तसेच ऍड वैशाली चौधरी यांनी महिलांच्या कायदेशीर हक्क व अधिकार आणि ऍड मुकेश चौधरी यांनी जमीन विषयक कायदा संदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाप्रसंगी अधिवक्ता परिषदेचे अध्यक्ष राजेश जी शर्मा यांनी उपस्थितांना कायदेविषयक समस्या असल्यास मोफत निराकरण करण्याचे आश्वासन दिले.ऍड सचिन कोष्टी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केलेतर ऍड योगेश दलाल यांनी आभार प्रदर्शन केले.

याप्रसंगी गावातील नागरिक ईश्वर चौधरी ,नथू तळेले ,ज्ञानेश्वर तळेले , राहुल तळेले , सोपान कोळी , गुणवंता चौधरी , मोहन डोळे , श्रावण डोळे ,दिगंबर पाटील , राकेश पाटील ,ऋषी पाटील , वासुदेव पाटील , कल्पना डोळे , पंचफुला डोळे दुर्गाबाई डोळे , भारती कोळी , नलू बाई सोनवणे , अनिता सोनवणे इत्यादी उपस्थित होते.