मध्य रेल्वे पुणे विभागात दौंड आणि मनमाड विभागातील राहुरी आणि पाडेगांव स्थानकांदरम्यान दुहेरीकरणासाठी कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी प्री-नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग कामांसाठी ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक परीचालीत करणार आहे
प्री नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉकमुळे होणारे परिणाम:
गाड्याचे रद्दीकरण:

- गाडी क्र. ०२१३२ जबलपूर – पुणे विशेष प्रवास सुरु दिनांक २२.०९.२०२४ रोजी रद्द.
- गाडी क्र. ०२१३१ पुणे – जबलपूर विशेष प्रवास सुरु दिनांक २३.०९.२०२४ रोजी रद्द.
गाड्याचे मार्ग परिवर्तन: - गाडी क्र. १७६२९ पुणे – नांदेड एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक २१.०९.२०२४ आणि २२.०९.२०२४ रोजी कुर्डुवाडी–लातूर रोड–परळी–परभणी मार्गे धावेल.
- गाडी क्र. १७६३० नांदेड – पुणे एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक २१.०९.२०२४ आणि २२.०९.२०२४ रोजी परभणी, परळी, लातूर, कुर्डुवाडी दौंड मार्गे धावेल.
- गाडी क्र. १२७७९ वास्को दि गामा – हजरत निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक २२.०९.२०२४ रोजी पुणे, लोणावळा, कर्जत, पनवेल, कल्याण, इगतपुरी, मनमाड मार्गे नियमित मार्गाने धावेल.
- गाडी क्र. ११०७८ जम्मूतवी – पुणे झेलम एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक २१.०९.२०२४ रोजी मनमाड, कोपरगांव, अहमदनगर, दौंड कॉर्ड लाईन ऐवजी इगतपुरी, कल्याण, पनवेल मार्गे पुणे ला जाईल.
- गाडी क्र. १२७८० हजरत निजामुद्दीन – वास्को गोवा सुपरफास्ट एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक २२.०९.२०२४ रोजी मनमाड, कोपरगांव, अहमदनगर दौंड कॉर्ड लाईन ऐवजी इगतपुरी, कल्याण, पनवेल, पुणे मार्गे पुढे नियमित मार्गाने धावेल.
- गाडी क्र. २२६९० यशवंतपूर – अहमदाबाद एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक २२.०९.२०२४ रोजी पुणे, लोणावळा, कर्जत, कल्याण, वसई रोड, सुरत मार्गे पुढे नियमित मार्गाने धावेल.
- गाडी क्र. २०६५८ हजरत निजामुद्दीन – हुबळी एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक २२.०९.२०२४ रोजी इगतपुरी, कल्याण, पनवेल, लोणावळा, पुणे, दौंड मार्गे पुढे नियमित मार्गाने धावेल.
गाड्यांचे वेळापत्रक: - गाडी क्र. ११०२५ पुणे – अमरावती हुतात्मा एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक २३.०९.२०२४ रोजी आपल्या नियोजित वेळेपेक्षा ०३ तास ३० मिनिटे उशीराने पुणे स्थानक येथून सुटेल.
- गाडी क्र. १२६२७ बेंगलोर – नई दिल्ली कर्नाटक एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक २२.०९.२०२४ रोजी आपल्या नियोजित वेळेपेक्षा ०४ तास उशीराने बेंगलोर स्थानक येथून सुटेल.
- गाडी क्र. ०५२९० पुणे – मुज्जफरपूर विशेष प्रवास सुरु दिनांक २३.०९.२०२४ रोजी आपल्या नियोजित वेळेपेक्षा ०८ तास उशीराने पुणे स्थानक येथून सुटेल.
गाड्यांचे थांबे, रचना, मार्ग आणि वेळेबद्दल तपशीलवार माहितीसाठी, प्रवाशांनी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या.
प्रवाशांना विनंती आहे की सुधारित कामामुळे होणाऱ्या गैरसोयीसाठी रेल्वेला सहकार्य करावे आणि कृपया त्यानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे.


