भुसावळ – भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयतिल शहरी व ग्रामिण विद्यार्थ्यांसाठी ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंदाची” स्थापना करण्यात आली आहे. सदर केंद्राचे उद्घाटन दुरदृष्य प्रणालीद्वारे मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिनांक 20 सप्टेंबर, 2024 रोजी पार पडले. सदर कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा, उपमुख्यमंत्री . देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री . अजित पवार दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थितीत होते.
याप्रसंगी नाहाटा महाविद्यालयात व्यासपीठावर संस्थेचे सचिव विष्णू चौधरी, खजिनदार संजय नाहाटा, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. रजनीताई सावकारे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. एस. व्ही. पाटील, उपप्राचार्य प्रा. डॉ. बी एच बऱ्हाटे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. वाय.एम. पाटील, पर्यवेक्षिका प्रा. स्वाती पाटील तसेच महाविद्यालतील आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे समन्वयक प्रा. डॉ. एस. डी. येवले उपास्थित होते.
या नाविण्यपूर्ण प्रकल्पामुळे परिसरातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम विनामूल्य उपलब्ध होतील. नाहाटा महाविद्यालयात या केंद्राद्वारे नॅशनल ग्रीन मिशन शी सुसंगत असे ग्रीन हायड्रोजन शी निगडित दोन कोर्स तसेच ऑफिस अससिस्टन्ट चा एक कोर्स विद्यार्थ्यांना उपलब्ध केले जातील.

या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आव्हान कार्यक्रमाचे अध्यक्ष विष्णू चौधरी यांनी उपस्थितांना केले. या उद्घाटन सोहळ्यास शुभेच्छा देण्यासाठी भुसावळ तालुका भाजपा अध्यक्ष प्रशांत पाटील, श पुरुषोत्तम नारखेडे (मा नगरसेवक), बापू. महाजन (मा नगरसेवक), एडवोकेट बोधराज चौधरी (नगरसेवक), तसेच निरीक्षक म्हणून आचार्य चाणक्य कौशल केंद्र जळगाव चे नोडल अधिकारी व ग्रुप इन्स्ट्रक्टर अनिल कोल्हे उपस्थित होते.
सदर कार्यक्रम हा ताप्ती एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष . डॉ. मोहन फालक आणि चेअरमन महेश फालक यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सचिन येवले, सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन डॉ. चंद्रकांत सरोदे यांनी केले. सदर उदघाटन सोहळ्यास महाविद्यालतील विद्यार्थी, तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपास्थित होते. या कार्यक्रमासाठी प्रा. जी. आर. वाणी, प्रा. डॉ. किरण वारके, डॉ. ममता पाटील, डॉ. मनोज जाधव, प्रा. संगीता भिरूड, प्रा. पुनम महाजन, प्रा. प्रशांत पाटील, डॉ. सचिन कोलते, डॉ. अजय क्षिरसागर, डॉ. सचिन राजपुत आणि प्रा. खिलेश पाटील यांनी परिश्रम घेतले.



