भुसावळ – आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निरीक्षक भास्कराव काळे यांचा दौरा भुसावळ विधानसभा क्षेत्रात होत आहे निवडणूक संदर्भात तयारीच्या दृष्टीने पक्षाची भूमिका ध्येय धोरण आदी बाबींवर चर्चा विनिमय करण्यासाठी पक्षाचे निरीक्षक भास्कराव काळे यांचे अध्यक्षतेखाली भुसावळ तालुका पदाधिकारी व कार्यकर्ता यांच्या बैठकीचे रविवार दिनांक 15/09/2024 रोजी स्वास्तिक लॉन तळवेल फाट्याजवळ वरणगाव येथे सायंकाळी 5:00 वाजता आयोजन करण्यात आलेले आहे.

या बैठकीस जिल्हाध्यक्ष प्रमोद बापू पाटील व माजी आमदार संतोष चौधरी माजी जिल्हाअध्यक्ष भैय्यासाहेब रविंद्र पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष .राजेंद्र चौधरी, जिल्हा कार्याध्यक्ष शालिग्राम मालकर आदी मार्गदर्शन करणार आहेत तरी भुसावळ विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे आजी,माजी जी.प.सदस्य, पं.स.सदस्य, नगराध्यक्ष नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते , सरपंच,उपसरपंच, ग्रा.प.सदस्य, बूथ प्रमुख, बूथ सदस्य यांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भुसावळ तालुका अध्यक्ष दीपक मराठे , भुसावळ शहर अध्यक्ष दुर्गेश ठाकूर , वरणगाव शहर अध्यक्ष समाधान चौधरी ,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व फ्रंटलचे तालुकाध्यक्ष व शहरध्यक्ष यांनी केले आहे .


