भुसावळात साकारला जेजुरी मंदिर देखावा :

भुसावळ – येथील कुलकर्णी प्लॉट भागातील रहिवासी संदीप घन व सौ वृषाली घन यांच्या घरी त्यांचा मुलगा वरद याने जेजुरी येथील मार्तंड मल्हार खंडेराव महाराज यांच्या मंदिराची प्रतिकृती तयार करून आपल्या लाडक्या बाप्पाची गणरायाची आकर्षक सजावट केली . वरद याने साकारलेल्या आकर्षक सजावटी चे परिसरात कौतुक होत आहे .